Wednesday, March 16, 2011

Raigad Fort - Kindom of Marhatas...









            किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राजाच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून १७व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवाजीचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायर्‍या आहेत. इंग्रजांनी गड कबजात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली.    
       याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर.
       शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना. ता. १९ मे १६७४ रोजी राज्याभिषेकादि विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे दर्शन घेतले. तीन मण सोन्याचे म्हणजेच ५६ हजार किंमतीचे छत्र देवीला अर्पण केले. गडावरील राजसभेत ता. ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक साजरा झाला. ता. २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी आश्विन शुद्ध ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

१.पाचाडचा जिजाबाईंचा वाडा 

२.खुबलढा बुरूज

3..नाना दरवाजा

४.मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा

५.महादरवाजा

६.चोरदिंडी

७.हत्ती तलाव

८.गंगासागर तलाव

९.स्तंभ

१०.पालखी दरवाजा

११.मेणा दरवाजा

१२.राजभवन

१३. रत्नशाळा

१४.राजसभा

१५.नगारखाना

१६.बाजारपेठ

१७.शिर्काई देऊळ

१८.जगदीश्र्वर मंदिर

१९.महाराजांची समाधी

२०.कुशावर्त तलाव

२१.वाघदरवाजा

२२.टकमक टोक

२३.हिरकणी टोक     

 

               


         

        


No comments:

Post a Comment